ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

इराणचे सर्वोच्च नेता भारताला म्हणाला अत्याचारी हुकूमशाह

तेहरान, दि. २८ (वृत्तसंस्था) - जगभरातील मुस्लिमांना शोषक आणि हुकूमशहांविरोधात काश्मीरी जनतेला साथ देण्याचे आवाहन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी केले आहे. अयातुल्ला खोमेनी यांनी सोमवारी करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, बहारिन, काश्मीर, यमनसारख्या ठिकाणांना मुस्लिम देशांनी खुले समर्थन दिले पाहिजे. तसेच रमजानमध्ये हल्ला करणा-या शोषक आणि हुकूमशहांविरोधात आवाज उठवला पाहिजे. भारत आणि इराणमध्ये चांगले मैत्रीपुर्ण संबंध राहिले आहेत. अशा परिस्थितीत अयातुल्ला खोमेनी यांनी काश्मीरचा उल्लेख करत मुस्लिम देशांचा मुद्दा उपस्थित करणे, तसेच अप्रत्यक्षरित्या भारताला शोषक म्हणणे भारताला आवडलेले नाही. या वक्तव्याचा भारताकडून स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

अयातुल्ला खोमेनी यांनी ईदच्या मुहूर्तावर करण्यात आलेल्या भाषणात जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते यावेळी या सर्वांचा एकच शत्रू असल्याचेही बोलले आहेत. सौदी अबर, सुन्नी अरब आणि भारताला अयातुल्ला खोमेनी यांनी एकाच पंक्तीत आणून बसवले आहे.