ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

केंद्रीय मंत्री राधा मोहन सिंग यांची करामात

नवी दिल्ली, दि. २९ (वृत्तसंस्था) - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र स्वच्छ भारतचा नारा देत आहेत, शौचालयाचं महत्त्व पटवून देत आहेत, मात्र केंद्रीय मंत्रीच उघड्यावर मूत्रविसर्जन करताना कॅमेरात कैद झाले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग एका भिंतीवर लघुशंका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राधा मोहन सिंग त्यांच्या कारजवळ असलेल्या एका भिंतीकडे तोंडकरुन लघवी करत आहेत, तर त्यांचे सुरक्षा अधिकारी त्यांच्याकडे पाठ फिरवून उभे आहेत. बिहारमध्ये मोतिहारी गावाच्या दौऱ्यावर असताना राधा मोहन सिंग यांनी हा प्रताप केला आहे. मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलन भडकलेलं असताना राधा मोहन सिंग योगगुरु रामदेव बाबांसोबत योगा करत होते, त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अशोभनीय वर्तन करताना आढळल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.