ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतीय जवानांबाबत आझम खान यांचे वादग्रस्त वक्तव्य

लखनौ, दि. ३० (वृत्तसंस्था) - समाजवादी पक्षाचे वादग्रस्त नेते आझम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आझम खान यांनी भारतीय सैन्याच्या जवानांवर अप्रत्यक्षपणे बलात्काराचा आरोप केला आहे. आझम खान यांच्या या विधानावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

बुधवारी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा एक व्हिडीओसमोर समोर आला आहे. आझम खान या व्हिडीओमध्ये म्हणतात, सैन्यातील जवानांचे गुप्तांग दहशतवाद्यांनी कापून नेले. त्यांना जवानांच्या हात, डोक किंवा पायावर आक्षेप नव्हता. त्यांना शरीराच्या ज्या भागावर आक्षेप होता तोच भाग त्यांनी कापून नेला. या घटनेमुळे संपूर्ण देशाची नाचक्की झाली असून आपण जगाला काय तोंड दाखवणार आहोत असा सवाल त्यांनी विचारला आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये आझम खान यांचा व्हिडीओ झळकताच त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. प्रकरण चिघळत असल्याचे दिसताच समाजवादी पक्षाने आझम खान यांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सध्या देशातील परिस्थिती संवेदनशील असताना आझम खान यांनी हे विधान केले असून या विधानाची आम्ही निंदा करतो असे सपाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तर भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह यांनी आझम खान यांच्यावर टीका केली. आझम खान हे फुटिरतावादी आणि दहशतवाद्यांची भाषा बोलत आहेत. समाजवादी पक्षच त्यांच्या नेत्यांना असे वादग्रस्त विधान करायला लावत असल्याचा आरोप भाजपने केला.