ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

तामिळनाडूतील थियटर्स जीएसटीमुळे ३ जुलैपासून बंद

चेन्नई, दि. १ (वृत्ततसंस्था) - तामिळनाडू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सने जीसएसटीला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व थियटर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली असताना कोणतीही स्पष्टता होत नसल्यामुळे जुलैपासून थियटर्स बंद राहणार आहेत.

सरकारकडून थियटर्स मालकांनी किती कर भरायचा याची स्पष्टता होत नाही. या आठवड्याच्या अखेरीस राज्य सरकारने हे स्पष्ट करावे. सोमवारपासून संपूर्ण राज्यातील चित्रपटांचे सर्व शो बंद ठेवण्यात येतील, असे तामिळनाडू फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अबिरामी रामनाथन यांनी म्हटले आहे. जीएसटी बाबत स्पष्टता होत नसल्यामुळे मल्टीप्लेक्समधील तिकीटांचे बुकींगदेखील सुरू करण्यात आलेले नाही. जीएसटीमध्ये मनोरंजन करदेखील लावण्यात आला तर आम्हाला ५३ टक्के एवढा कर सरकारला भरावा लागेल. आमच्यासाठी हे योग्य नाही. फिल्म इंडस्ट्रीतील १० लाख कुटुंबाना या निर्णयाचा फटका बसू शकतो, असेही ते म्हणाले. १०० रुपयांवरील तिकीटांना २८ टक्के एवढा जीएसटी भरावा लागणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.