ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जवानांचा अपमान प्रकरणी आझम खानविरोधात देशद्रोहाचा

मेरठ, दि. १ (वृत्तसंस्था) - बिजनोरमधील चंदपूर पोलीस ठाण्यात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या जवानांवर बलात्काराचा आरोप करत आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कलम १२४ , १३१ आणि ५०५ अंतर्गत आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हा गुन्हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनिल पांडे यांच्या तक्रारीनंतर दाखल करण्यात आल्याची माहिती चंदपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अजय कुमार सिंग यांनी दिली आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आंदोलन करत कारवाईची मागणी केली होती. सदर पोलीस ठाण्यातही त्यांनी तक्रार केली होती. दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे शहाजहाँपूरमधील जिल्हा समन्वयक राजेश कुमार अवस्ती यांनी आझम खान यांची जीभ आणणाऱ्याला ५० लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.