ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानने फेटाळली कुलभूषणला वकील देण्याची मागणी

इस्लामाबाद, दि. ३ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी वकील देण्याची भारताची मागणी पुन्हा फेटाळली असून एप्रिल महिन्यात पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

पाकिस्तानी कारागृहात जाधव असून, त्यासाठी वकील देणे तर्काच्या विरुद्ध आहे, अशी टिप्पणी पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानने या अगोदरही कुलभूषणसाठी वकील नाकारला आहे. शनिवारी पुन्हा भारताने कुलभूषणसाठी वकिलाची मागणी केली. पण भारताच्या मागणीवर टिप्पणी करत पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने वकील नाकारला. रम्यान, ४६ वर्षीय कुलभूषण पाकिस्तानी कारागृहात असून, त्याच्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने तात्पूर्ती स्थगिती दिली आहे.