ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हा देश मोदींच्या बापाचा नाही - छोटे ओवेसी बरळले

हैदराबाद, दि. ४ (वृत्तसंस्था) - आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी यावेळेस पुन्हा एकदा संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध गरळ ओकली आहे.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांनी लक्षात ठेवावे भारत देश तुमच्या बापाचा नाही, तो जेवढा तुमचा आहे तो तेवढाच मुस्लिम बांधवांचाही आहे, असेही ओवसींनी म्हटले आहे. देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात अजिबात विकास झाला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तुमच्या बापाचा हा देश नाही, राजकारणाला तुम्ही धार्मिक रंग दिला आहे, या देशावर मुस्लिमांचाही हक्क असल्याचे अकबरूद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. तसेच, मुस्लिम असणे हा गुन्हा आहे का? टोपी घालणे हा गुन्हा आहे का? तुम्ही धर्माचे राजकारण करता ही बाब चुकीची आहे असेही या व्हिडिओत ओवेसी बोलताना दिसत आहेत. निवडणुकांसाठी मत मागतानाचा हा व्हिडीओ प्रसारमामध्यमांनी प्रसारित केला आहे.

या देशात अखलाखची हत्या करण्यात आली, जुनैदची हत्या करण्यात आली, काही दिवसांपूर्वीच बलात्कार पीडितेवर अॅसिड हल्ला करण्यात आला, मुस्लिम समाजातील लोकांच्याच हत्या होत आहेत, देशातील सेक्युलर लोक उघड्या डोळ्यांनी हा तमाशा बघत आहेत का? असाही प्रश्न ओवेसींनी विचारला आहे.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात अक्षरशः गरळ ओकली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. मी बीफ खातो आणि जोवर जिवंत आहे तोवर खात राहणार मला अडवणारे तुम्ही कोण? असेही ओवेसी यांनी विचारले आहे. ३० जानेवारी २०१७ रोजीचा हा व्हिडीओ आहे. ओवेसी हैदराबादच्या बाबा नगरमध्ये नगरपालिका निवडणुकांचा प्रचार करत होते.