ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कपिलच्या शोमध्ये केलेला तो विनोद कुमार विश्वास यांच्या अंगलट

नवी दिल्ली, दि. ५ (वृत्तसंस्था) - आम आदमी पक्षाचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांच्याविरोधात दिल्लीत कपिल शर्मा शोमध्ये महिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा कार्यक्रम जुलै रोजी दाखवण्यात आला होता. कुमार विश्वास यांच्यासोबत शायर राहत इंदौरी आणि शायरा शबीना अदिबदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कुमार विश्वास यांच्याविरोधात दिल्लीतील डाबरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुमार विश्वास यांनी कपिल शर्मा शोमध्ये महिलांविरोधात अतिशय अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधान केल्याचे तक्रारकर्त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. निवडणुकांच्यावेळी नेत्यांना त्यांच्या कॉलनीमध्ये प्रचारादरम्यान मोठ्या अडचणी येतात. ज्या मुलीसोबत तुमचे प्रेमसंबंध होते, तिच्या पतीलादेखील भावोजी म्हणावे लागते. भावोजी मतदान करा. सामान तर तुम्ही घेऊन गेलात, असे बोलण्याची वेळ येते, असे आक्षेपार्ह विधान कुमार विश्वास यांनी केले होते.

दक्षिण दिल्लीतील डाबरी पोलीस ठाण्यात कुमार विश्वास यांनी केलेल्या या अपमानास्पद विधानाबद्दल त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कपिल शर्मा शो मी पाहत होतो, त्यावेळी कुमार विश्वास यांनी आक्षेपार्ह विधान केले. यानंतर माझ्या मुलीने, आई लग्नानंतर आम्हीदेखील सामान होणार का? असा प्रश्न विचारला, असे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित महिलेने महिला या काय वस्तू असतात का?’, असा सवालदेखील उपस्थित केला आहे.