ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महिलेवर हल्ला प्रकरणी तीन आप आमदारांवर गुन्हा

नवी दिल्ली, दि. ६ (वृत्तसंस्था) - विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना एका महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या तिघा आमदारांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिवेशन सुरू असताना दि. २८ जून रोजी विधिमंडळात जाण्यासाठी पास मिळाल्याने आपण आवारात उभ्या असताना जर्नेलसिंग आणि अमानतुल्ला खान हे सत्ताधारी आमदार तिथे आले. त्यांनी आपल्याला जबरदस्तीने एका खोलीत नेले. त्या खोलीत आणखी दोघांना मारहाण केली जात होती. या आमदारांनी आपल्यालाही अमानुष मारहाण केली. त्यानंतर सोमनाथ भारती हे देखील त्या खोलीत आले आणि ते ही मारहाणीत सहभागी झाले; असे पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

या महिलेच्या तक्रारीवरून सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस सुरू आहे; अशी माहिती पोलीस उपयुक्त जातीं नरवाल यांनी दिली. मात्र विधानसभेच्या आवारात घडलेल्या कोणत्याही घटनेबाबत पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करू शकत नसल्याचा दावा विधिमंडळ प्रवक्ते रामनिवास गोयल यांनी केला. या घटनेबाबत अद्याप आपल्या कार्यालयाकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावाही त्यांनी केला.