ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोदी आणि सरकारला हटवूनच शांत बसेन – लालूप्रसाद यादव

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) - आपला हॉटेल हस्तांतरणात झालेल्या घोटाळ्याशी काहीही संबंध नसून भाजप-आरएसएसने मला अडकवण्यासाठीच कट रचला आहे. या घटनेला मी आणि माझा पक्ष घाबरणार नाही. मोदी आणि त्यांच्या सरकारला हटवूनच शांत बसेन, लालूप्रसाद यादव यांनी असा निर्धार बोलून दाखवला.

दरम्यान लालूप्रसाद यादव यांनी देशाची अवस्था खूपच वाईट असल्याचे म्हटले असून मी काहीही चुकीचे केलेले नाही. भाजप आणि संघ मला यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. आयआरसीटीसीची स्थापना १९९९ मध्ये झाली. २००२ मध्ये काम प्रत्यक्षात सुरु झाले. रेल्वेने २००३ मध्ये हॉटेल-प्रवासी निवासस्थान आयआरसीटीसीकडे सोपवले. आयआरसीटीसीने २००६ मध्ये खुली निविदा प्रक्रिया सुरू केली. सर्व काही नियमांनुसार केले आहे. झालेल्या घोटाळ्याशी आमचा काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्टीकरण लालूप्रसाद यादव यांनी दिले आहे.