ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आसिआनमधील देशांना प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रण देणार भारत

नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) - आसिआन संघटनेच्या १० सदस्य देशांच्या प्रमुखांना भारत प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी आणि संचलनाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देणार आहे. पूर्व आशियातील या देशांशी संवाद साधण्याची नवी संधी भारताला अॅक्ट इस्ट या नव्या धोरणानुसार या निमित्ताने मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रजासत्ताक दिनासाठी पाहुणे म्हणुन बोलावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

ब्रुनेई, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया, लाओस, म्यानामार, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, व्हीएटनाम हे देश आसिआनमध्ये सदस्य आहेत. भूटानजवळच्या भागामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून चीन करत असलेल्या घुसखोरीमुळे वाढलेल्या तणावावर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. रालोआ सरकार २०१४ साली सत्तेमध्ये आल्यानंतर लूक इस्टबरोबर अॅक्ट इस्ट धोरण जाहीर करण्यात आले होते. पूर्व आणि आग्नेय आशियातील देशांशी सौहार्दपुर्ण संबंध वृद्धींगत करणे हे त्यामागचे मूळ ध्येय होते.