ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जिओ फक्त १४९ रुपयात देणार वर्षभर इंटरनेट

नवी दिल्ली, दि. १० (वृत्तसंस्था) - पुन्हा एकदा धमाकेदार ऑफर आपल्या ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपन्यांच्या विश्वात हादरा देणाऱ्या जिओ कंपनीने आणली आहे. यामध्ये जिओ ग्राहकांना अवघ्या १४९ रुपयात वर्षभर इंटरनेट मिळणार आहे. ही ऑफर केवळ जिओच्या वाय-फाय ग्राहकांना मिळणार आहे.

कमी पैशात कॉल्स आणि इंटरनेट सेवा दिल्याने जिओमुळे अनेक टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले होते. अनेक कंपन्यानी या धक्क्यातून सावरण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देऊ करण्याचा प्रयत्न केला. मोफत मोबाईल कॉल्स इंटरनेट सेवा देणाऱ्या रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता अजून एक नवी ऑफर आणली आहे.

आपल्या वाय-फाय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने डेटा ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांना सर्वात आधी १९९९ रुपये किंमतीचे जिओ वाय-फाय राउटर खरेदी करावे लागणार आहे. त्यानंतर एक नवे सिमकार्ड खरेदी केल्यानंतर ९९ रुपयांचा रिचार्ज करून जिओची मेंबरशीप स्वीकारावी लागेल. हे सर्व पार पडल्यानंतर कंपनीच्या कोणत्याही एका प्लानमधून रिचार्ज करावे लागेल.

असे असणार आहेत जिओचे प्लान
१४९ रुपयांचा जिओचा पहिला प्लान हा असणार आहे. हा पहिला प्लान रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना १२ महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला जीबी इंटरनेट मिळणार आहे. दुसरा प्लान हा ३०९ रुपयांचा आहे. यात महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला जीबी डेटा मिळेल. तिसरा Posted On: 10 July 2017