ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुझफ्फरनगरमधून अटक

श्रीनगर, दि. १० (वृत्तसंस्था) - जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी मझफ्फरनगरमधून दक्षिण अशियात दहशतवादी कारवाया करण्याऱ्या पाकिस्तानच्या लष्कर--तोयबा या संघटनेच्या दहशतवाद्याला अटक केली आहे.

दहशतवादी संघटनेत मुळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला नागरिक सक्रिय असून दक्षिण काश्मिरात त्याने केलेल्या कारवाईत आतापर्यंत एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा आणि पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. पोलिसांनी संदीप कुमार शर्मा उर्फ अदिल (रा. मुझफ्फरनगर .प्र.) तर दक्षिण काश्मिरातील कुलगम येथील रहिवासी असलेला मुनिब शाह यांना अटक केली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी मनिर खान यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये नवनव्या हल्ल्याबरोबर दहशतवादी इतर गुन्हेही करण्यात सक्रिय झाले आहेत. या दहशतवाद्यांनी चोरी, मारामारी, बँक लूट आणि एटीएम फोडण्यासारखे गुन्ह्याचा मार्ग अवलंबिला आहे. बँकवर हल्ले करून दहशतवाद्यांना चलन पुरवण्यात येत आहे. लष्कर--तोयबाचा कमांडर बशीर लष्करीला ज्या घरात गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. त्याच घरात संदीपला अटक करण्यात आली आहे.