ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मेन्यूकार्डातील खाद्यपदार्थांचे दर कमी करायला हवेत – महसूल सचिव

नवी दिल्ली, दि. १२ (वृत्तसंस्था) - जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर देशभरात लागू करण्यात आला आहे. पण सर्वसामान्यांमध्ये अद्यापही या नव्या करप्रणालीबाबत संभ्रम आहे. सरकारकडून तो दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ग्राहकांना हॉटेल, रेस्तराँमध्ये बिल दिले जाते. पदार्थांचे दर आणि त्यातही सेवा शुल्कही आकारले जाते. तसेच त्यात जीएसटी स्वरुपातही पैसे घेतले जातात. त्या बिलात अतिरिक्त स्वरुपात जीएसटीही आकारला जातो. अनेक शहरांमधील ग्राहकांच्या अशा तक्रारी आहेत. मग जीएसटी लागू होऊन त्याचा ग्राहकांना फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पण महसूल सचिव हसमुख अधिया यांनी आता जीएसटीचा लाभ ग्राहकांना द्यावा, असे सांगितले आहे. मेन्यूकार्डमधील पदार्थांचे दर कमी हॉटेल, रेस्तराँ आणि खाद्यगृह मालकांनी करावेत, असे त्यांनी म्हटले आहे. जेवणाच्या पूर्ण बिलावर जीएसटी आकारला जातो. त्यात सेवा शुल्काचाही समावेश असतो. केवळ मद्याचा त्यात समावेश नाही. कारण त्यावर अजूनही मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेस्तराँ, हॉटेलसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) असल्याने मालकांनी मेन्यूकार्डमधील पदार्थांचे दर घटवावेत, असेही त्यांनी सांगितले.

जीएसटीनुसार, नॉन-एसी रेस्तराँचा १२ टक्क्यांच्या कर टप्प्यात समावेश आहे. तर एसी रेस्तराँ आणि जिथे मद्यही मिळते, असे रेस्तराँचा १८ टक्के कर टप्प्यात समावेश आहे. मद्य वगळता हॉटेलात उपलब्ध असलेल्या पदार्थांवर जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे एकूण बिलावरच जीएसटी आकारण्यात येईल, असेही अधिया यांनी स्पष्ट केले.