ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंतप्रधान मोदींमुळे लग्न मोडले

कानपूर, दि. १२ – नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून ते सतत चर्चेत असतात. मोदींविषयी कोणी चांगले बोलतो तर कोणी वाईट. अनेकदा मोदी समर्थक व विरोधक आमने सामने येतात व त्यांच्यात प्रचंड वाद होतात. इथपर्यंत ठीक आहे हो, पण आता चक्क नरेंद्र मोदी यांच्यावरुन नवरा बायकोतही भांडणे होऊ लागली आहेत. असाच काहीसा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. सरकारी कर्मचाऱ्याच्या मुलीसोबत एका व्यवसायिकाचे लग्न ठरले. पण, मोदींवरुन त्यांच्यात झालेला वाद टोकाला गेला अन् शेवटी त्यांचे लग्नच मोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्याच्या एका मुलीसोबत एका व्यावसायिकाचे लग्न ठरले होते. अगदी शेवटी बोलणी सुरु असताना होणारा नवरा मुलगा आणि मुलगी हे दोघे मंदिरात गेले. तिथे त्यांच्यात देशाच्या आर्थिक स्थितीवरुन चर्चा सुरु झाली. यावेळी मुलगी देशाची आर्थिक स्थिती बिघडण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार असल्याचे म्हणाली. मुलाने त्याला केला विरोध. तो मोदींविरोधात काही एक शब्द ऐकून घेण्यास तयार नव्हता. या दोघांमुळे मोदींवरील वाद भयंकर पेटला आणि शेवटी त्याचे पर्यवसान लग्न मोडण्यात झाले.