ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

साक्षर होऊ नये म्हणून नवऱ्याने बायकोची बोटे छाटली

ढाका, दि. १३ - बायकोला शिकू नकोस असे सांगूनही ती ऐकत नसल्याने नवऱ्याने आपल्या बायकोची बोटेच छाटून टाकली. ही घटना बांगला देशातील ढाका येथे घडली आहे. नवऱ्याने पत्नीला तूला सरप्राईज देतो असं सांगून डोळे मिटायला सांगितले त्यानंतर तिला हात पुढे करायला सांगितला. तिने तसं करताच त्याने तिच्या उजव्या हाताची बोटेच छाटून टाकली. या प्रकरणी पोलिसांनी नवऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रफिकुल इस्लाम असे या ३० वर्षीय मजुराचे नाव असून त्याची बायको २१ वर्षांची आहे. हवा अख्तर असे तिचे नाव आहे. रफिकुल हा सौदी आमिरातमध्ये काम करतो. तो आपल्या मायदेशी आला असताना त्याने हे कृत्य केले, असे त्याच्या बायकोने सांगितले.

मी तुला सरप्राईज देतो, असे सांगून त्याने तिचे डोळे बांधले व तोंडावर पट्टी बांधली. नंतर त्याने तिला हात पसरण्यास सांगितले आणि तिने तसे केल्यावर त्याने तिची पाचही बोटे छाटली. त्याच्या एका नातेवाईकाने ती बोटे कचऱ्याच्या पेटीत टाकली जेणेकरून डॉक्टरांना ती परत शिवता येऊ नयेत.

रफिकुल हा संयुक्त अरब अमिरातीत काम करणारा स्थलांतरित मजूर आहे. हवा अख्तर हिने अभ्यास करणे थांबवले नाही तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी त्याने तिला दिली होती. ढाका पोलिसांनी रफिकुल याला अटक केली असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे, असे बांगलादेश पोलिस प्रमुख मोहम्मद सलुद्दीन यांनी सांगितल्याचे ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

मात्र एवढे होऊनही हवाने शिक्षणाची आशा सोडलेली नाही. ती डाव्या हाताने लिहायला शिकत असून परत अभ्यासाला सुरूवात करण्याचा निश्चय तिने केला आहे.