ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नवरदेव घोड्यासह विहिरीत कोसळला (व्हिडिओ)

गोंडा, (उत्तर प्रदेश), दि. १३ - लग्नसोहळा म्हटलं की वरात वाजत-गाजत निघणारच. फटाक्यांची आतषबाजी आणि नातेवाईक, मित्रमंडळींचा डान्स तर जबरदस्तच असतो. लग्नाच्या वेळी बऱ्याच चांगल्या-वाईट घटनाही घडताना दिसतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. तेथिल एका घरात लग्नाच्या काही वेळ आधी एक प्रसंग घडला. 

नवरदेव लग्नच्या मांडवात जाण्यासाठी तयार झाला होता. तसंच मुंडावळ्या बांधून तो घोडीवरही स्वार झाला होता. वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत वरात निघाली होती. पण त्यावेळी फटाक्यांच्या आवाजाने बिथरलेल्या घोडीने चक्क नवरदेवासह विहिरीत उडी घेतल्याचा प्रकार घडला आहे.  

नवरदेव घोडीवर स्वार झाल्यानंतर घरासमोरील विहीरीला ‘फेरा’ घालण्याची प्रथा उत्तर प्रदेशातील गोंडा गावात आहे. या प्रथेनुसार नवरदेव घोडीवर स्वार होऊन विहिरीला प्रदक्षिणा घालत होता. तिकडं वरातीत सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींचा जल्लोष सुरू होता. मित्रमंडळी उत्साहाने नाचत होती. तितक्यात कोणीतरी फटाके फोडले. त्याच्या आवाजाने घोडी बिथरली. ती सैरावैरा पळू लागली. वरातीत एकच गोंधळ उडाला. फटाक्यांच्या आवाजाने बिथरलेल्या घोडीने थेट विहिरीतच उडी घेतली. नवरदेवही विहिरीत पडला.

वऱ्हाडीमंडळीच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण या घटनेनंतर सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंता होती. घोडीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन मागवण्यात आली. शर्थीच्या प्रयत्नानंतर दोरखंडाने नवरदेवाला बाहेर काढले. सुदैवाने यात नवरदेवाला कोणतीही दुखापत झाली नाही.