ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राजस्थानी वधूसाठी मोजत आहेत १ लाख रुपये

राजस्थान, दि. १३ - राजस्थानात मुलींचा जन्मदर कमी असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लग्नासाठी इच्छुक असलेल्या वरांना वधू शोधण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे.  राजस्थानातील माहेश्वरी, बनिया, जैन आणि ब्राह्मण समूदायाचे लोक लग्नासाठी इतर राज्यातून मुलींना दलालाकरवी खरेदी करून आणून त्यांच्याशी लग्न करीत आहेत.

पैसे मोजून वधू विकत घेणाऱ्यांसाठी दलालांचा सुळसूळाट झाला आहे. हे दलाल समाजातील अशा व्यक्तींवर लक्ष ठेवून असतात की ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही. हे दलाल त्यांना गाठतात मुलगी मिळवून देण्यासाठी ५० हजार ते १ लाख रुपयांची मागणी करतात.  

एका दलालाने म्हटले आहे की, यात वाईट काय आहे. वधू व वर यांना यात गैर वाटत नाही तर इतरांना वाईट वाटण्याचे कारण नाही. या दलालाने सांगितले की त्याने आतापर्यंत शेकडो लग्ने असे पैसे घेऊन लावून दिली आहेत.

बनिया समुदायाच्या ४२ वर्षीय नामीचंद नावाच्या व्यक्तीने सांगितले की, मला माझ्या समाजातील मुलगी लग्नासाठी मिळत नव्हती. नामीचंद एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी झारखंडमधील एक मुलगी विकत घेतली व तिच्याशी लग्न केलं. आता दोघेही सुखसमाधाना राहत आहेत. त्यांना एक छोटा मुलगाही आहे. नामीचंदने सांगितले की मी एक लाख रुपये खर्च करून वधू मिळवली आहे.