ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

गोरक्षक कसले हे तर नरभक्षक - रामदास आठवले

अहमदाबाद, दि. १४ - गोरक्षणाच्या नावावर देशभरात सुरू असलेल्या हिंसक घटनांचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'स्वत:ला गोरक्षक म्हणवून घेत लोकांना मारणारे गोरक्षक हे प्रत्यक्षात 'नरभक्षक' आहेत,' अशी टीका  आठवले यांनी केली आहे.

विविध राज्य सरकारांच्या सामाजिक न्याय खात्यातर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. आठवले म्हणाले की, गोरक्षणाच्या नावावर हिंसाचार करणाऱ्यांवर देशातील सर्व राज्य सरकारं कारवाई करत आहेत. लोकांवर हल्ले करणारे खरे गोरक्षक नाहीत, ते नरभक्षक आहेत. 'दलितांवर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. हे प्रकार थांबण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. केंद्र सरकारचं सामाजिक न्याय खातं त्या दृष्टीनं काम करत आहे,' असंही त्यांनी सांगितलं.