ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आया-बहिणी प. बंगालमध्ये गेल्यास बलात्कार होणारच – खा. गांगुली

कोलकाता, दि. १५ (वृत्तसंस्था) - पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचारानंतर देशभरातील नेते ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपल्या घरातील स्त्रीला ममता बॅनर्जी सरकारचे समर्थन करणा-यांनी पश्चिम बंगालमध्ये पाठवायला हवे. ममता बॅनर्जी यांच्या पाठिंब्याशिवाय येणा-या महिलांवर १५ दिवसांत बलात्कार होईल असे वादग्रस्त वक्तव्य रुपा गांगुली यांनी केले आहे.

भाजप खासदार रूपा गांगुली यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये महिलांवर बलात्कार होईल एवढ्या त्या येथे असुरक्षित आहेत आणि ऐवढी येथील परिस्थिती बिघडलेली आहे. हिंमत असेल तर ममता समर्थकांनी आणि नेत्यांनी ममता बॅनर्जींच्या पाठिंब्याशिवाय आपल्या घरातील आया-बहिणींना पश्चिम बंगालमध्ये पाठवावे, त्यांच्यावर १५ दिवसांत बलात्कार होईल.

पश्चिम बंगालच्या २४ जिल्ह्यांमध्ये जातीय दंगल सुरू आहे, या दंगलीचे लोण बसीरतमध्येही येऊन