ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काश्मीरमधील तणावामागे परकीय शक्तींचा हात - मुफ्ती

नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था) - जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यातील तणावामागे परकीय शक्तींचा हात असून, चीननेही आता येथे लक्ष घालण्यास सुरवात केल्याचे म्हटले आहे.

काश्मीर खोऱ्यात हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीला ठार मारल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांमध्येही मोठी वाढ झाली आहे. दगडफेकीच्या घटनाही वारंवार घडत आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची आज भेट घेतली. त्यांना या भेटीनंतर काश्मीरमधील वातावरण दूषित करण्यासाठी परकीय शक्ती काम करत असल्याचे म्हटले आहे.

मुफ्ती म्हणाल्या, बाहेरील शक्ती काश्मीरमध्ये सुरु असलेल्या लढाईमध्ये काम करत आहे. आता चीननेही लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. मला आनंद आहे, की काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. काश्मीरमधील समस्यांना सर्व मिळून तोंड देत आहेत. काश्मीरमध्ये आम्ही कायदा आणि सुव्यवस्था लादत नाही. जोपर्यंत पूर्ण प्रदेश आणि राजकीय पक्ष मदत करत नाहीत, तोपर्यंत परकीय शक्तींविरोधातील लढाई जिंकू शकत नाही.