ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आता गोरक्षकांना ओळखपत्र देणार हरियाणा सरकार

चंदीगड, दि. १७ (वृत्तसंस्थक) – हरियाणा राज्य सरकारने गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर हरियाणा सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आता गोरक्षकांना हरियाणा सरकार ओळखपत्र देणार आहे, ज्यामुळे गोरक्षक सहजपणे ओळखता येतील. हा निर्णय हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या नावावर हिंसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. गोमातेचे संरक्षण गरजेचे आहे. पण त्यासाठी कायदा आहे. कायदा हातात घेऊन वैयक्तिक दुश्मनी काढण्यासाठी गोरक्षेच्या नावावरील हिंसा सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला.

राजधानी दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस अगोदर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मोदींनी या बैठकीत देशात गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसेबाबत वक्तव्य केले. गोरक्षेच्या नावावर हिंसा करणाऱ्यांना मोदींनी स्पष्ट शब्दात इशारा दिला. गोरक्षेच्या नावाखाली कुणी वैयक्तिक दुश्मनी तर काढत नाही ना, यावरही राज्य सरकारने लक्ष ठेवले पाहिजे. प्रत्येक राज्य सरकारने अशा घटनांना गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले.