ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रपती निवडणुक, अमित शाहांनी केले मतदान

नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंस्था) - देशाच्या १४व्या राष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदान केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मात्र अमित शाह हे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे करु शकले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. केवळ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी मतदान केलं का? तसा त्यांना अधिकार असतो का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

पण अमित शाह हे गुजरातचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी भाजप अध्यक्ष म्हणून नव्हे तर गुजरातचे आमदार म्हणून राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभा-राज्यसभेचे सदस्य मतदान करु शकतात. त्यामुळे अमित शाह यांनी आमदार म्हणून मतदान केलं.गुजरात विधानसभेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमित शाह हे नाराणपुरा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचं पारडं जड मानलं जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुंबईतही आमदारांचं मतदान होत आहे. विशेष म्हणजे जेलमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ आणि आमदार रमेश कदमही यांनाही मतदानाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं हे दोघेही मतदान करतील.