ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून व्यंकय्या नायडूंना उमेदवारी

नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंस्था) - आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरु असून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची एखाद्या दक्षिण भारतीय चेहऱ्याला संधी देण्याची रणनिती असल्यामुळेच उमेदवारी व्यंकय्या नायडूंना देण्यात आली. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीतारमन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत असल्याचे बोलले जात होते. पण व्यंकय्या नायडूंचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.

भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांपैकी व्यंकय्या नायडू हे एक आहेत. सध्या त्यांच्याकडे मोदींच्या मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आहे. २००२ ते २००४ या काळात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. तर तत्कालीन पतंप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रालयाची जबाबदारी होती. दक्षिण भारतातील भाजपचे महत्वाचे नेते म्हणून व्यंकय्या नायडूंकडे पाहिले जाते