ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कलम ३७० रद्द करण्यासाठी संघाने घ्यावा पुढाकार

जम्मू, दि. १८ (वृत्तसंस्था) - जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलाम ३७० रद्द करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घ्यावा आणि स्वतंत्र भारतात पारतंत्र्याचे जिणे जगणाऱ्या काश्मिरी पंडितांचे पुन्हा काश्मीरच्या खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा; अशी मागणी निर्वासित काश्मिरी पंडितांची संघटनापनून काश्मीरने केली आहे.

जम्मू येथे रा स्व संघाच्या प्रचारकांनी राष्ट्रीय पातळीवरील महत्वपूर्ण बैठक सुरू असतानापनून काश्मीरने ही मागणी केली आहे. जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० हे भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना आपण भारतीय नागरिकांपासून अलग असल्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे अलगाववादाला खतपाणी मिळत आहे; अशी टीका संघटनेचे अध्यक्ष अश्वनी चरूंगू यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

काश्मिरी पंडीत मागील २८ वर्ष स्वतंत्र भारतात निर्वासित म्हणून जगात आहेत. त्यांच्या वेदना या स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय सत्तेच्या जोखडाखाली जगणाऱ्या भारतीयांप्रमाणेच आहेत. जम्मूमध्ये होत असलेल्या रा स्व संघाच्या बैठकीत जर काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा ठराव करण्यात आला आणि संघाने पंडितांचे काश्मीर खोऱ्यातच पुनर्वसन करण्यासाठी संघाने पाठपुरावा केला; तर या बैठकीला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त होईल; असे संघटनेच्या राजकीय समितीचे अध्यक्ष एम एल रैना यांनी नमूद केले.