ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानी मदरशांमध्ये अफगाणी विद्यार्थ्यांची तस्करी

अफगाणिस्तान, दि. १ (वृत्तसंस्था) - अफगाणिस्तानातील लहान मुलांना तस्करी करून पाकिस्तानात नेण्याची योजना सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे.

अफगाणिस्तानातील पूर्व गझनी प्रांतातील पोलिस नियमित तपासणी करत होते. त्यावेळी त्यांना लायसेन्स प्लेट नसलेली दोन वाहने आढळली. त्यांची तपासणी केल्यावर त्यांमध्ये चार ते १५ वर्ष वयोगटातील २७ मुले आढळून आली. या मुलांना बलूचिस्तानातील मदरशांमध्ये नेण्यात येत होते. पाकिस्तानी मदरशांमध्ये नेल्यानंतर त्यांना तालिबानचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्यातून अफगाणिस्तानात परतून कट्टर इस्लाम आणण्यासाठी त्यांना तयार करण्यात येणार होते, असे एका अफगाणी अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी ही बाल तस्करी असल्याचे सांगून या घटनेशी संबंधित दोघा जणांची तुरुंगात रवानगी केली आहे. मात्र आमच्या मुलांना आम्हाला पाकिस्तानात शिकविण्याची इच्छा आहे आणि आम्ही स्वखुशीने त्यांना क्वेट्टा येथे पाठवत होतो, असे त्यांच्या पालकांनी सांगितले.

अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेले क्वेट्टा हे अफगाणी तालिबानांसाठी महत्त्वाचे आहे. तालिबान नेतृत्व परिषदेचे हे मुख्यालय असल्याचे मानले जाते तसेच त्यालाक्वेट्टा शूरानावानेही ओळखले जाते.

अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले, की अफगाणी गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानातील २६ मदरशांची निश्चिती केली असून तेथे भावी तालिबानांना प्रशिक्षण दिले जात असल्याचा संशय आहे.