ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

रेखा, सचिनला राज्यसभेतून निलंबित करण्याची मागणी

नवी दिल्ली, दि. १ (वृत्तसंस्था) - राज्यसभेचे खासदार असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या अनुपस्थितीवरुन राज्यसभेत गोंधळ झाला. जर सचिन आणि रेखाला राज्यसभेत यायचंच नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचं निलंबन करावं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली.

रेखा आणि सचिन यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा विजय माल्ल्याप्रमाणे संसदेनंच दोघांना निलंबित करावं अशी मागणी नरेश अग्रवाल यांनी केली. मार्च महिन्यातही अग्रवाल यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

क्रीडा, चित्रपट अशा विविध क्षेत्रातील १२ मान्यवरांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात येते. मात्र ते वारंवार अनुपस्थित राहत असल्यास, त्यांना या क्षेत्रात रस नसावा. त्यामुळे अशा व्यक्तींनी राजीनामा द्यावा, असं अग्रवाल म्हणाले.

२०१२ मध्ये रेखा आणि सचिन तेंडुलकरची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास ३४८ दिवसांपैकी सचिनने २३ तर रेखाने केवळ १८ दिवस सदनात हजेरी लावली. पावसाळी अधिवेशनातही दोघांनी उपस्थिती लावली नाही. गेल्या बजेट सेशनमध्ये (३१ जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१७) दोघांनी केवळ एक-एक दिवस हजेरी लावली.

कला, साहित्य, विज्ञान, सामाजिक शास्त्र अशा विविध क्षेत्रातील १२ सदस्यांचं राज्यसभेचं खासदार म्हणून नामांकन करण्यात येतं. रेखा, सचिन तेंडुलकर यांच्याशिवाय अनु आगा, संभाजी छत्रपती, स्वपन दासगुप्ता, रुपा गांगुली, नरेंद्र जाधव, एमसी मेरी कोम, के पारासरन, गोपी सुरेश, सुब्रह्मण्यम स्वामी आणि केटीएस तुलसी यांचा समावेश आहे.