ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा

काकापोरा, दि. १ (वृत्तसंस्था) - सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे चकमकीत लष्कर--तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अबु दुजानासह तीन दहशतवादी या परिसरात लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना मिळाली होती. जवानांनी धडक कारवाई करून दुजानासह दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

याबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते तेच घर सुरक्षा दलाच्या जवानांनी स्फोटकांनी उडवून दिले. दोन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला असून, आणखी एका दहशतवाद्याचा शोध घेण्यात येत आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली.

सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही सुरू होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. त्यानंतर भारतीय जवानांनी दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते तेच घर स्फोटकांनी उडवून दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडणे बंद झाल्याचे सांगितले जाते. हकदीपुरा येथे जवानांनी शोधमोहीम सुरू केली आहे.