ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काश्मीरप्रश्नी चीन-पाकिस्तान हम साथ साथ है

नवी दिल्ली, दि. २ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेज बाजवा यांनी काश्मीर प्रश्नी चीन पाकिस्तानला मदत करीत असल्याची कबूली दिली असून आम्ही चीनचे काश्मीरच्या मुद्द्यासह अणू पुरवठा गट आणि शांघाई सहकार्य संघटनेतील विस्तारासाठी पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल ऋणी आहोत, असे बाजवा यांनी म्हटले आहे. रावळपिंडी येथे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या स्थापना दिनानिमित्त चीन दुतावासाकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

बावजा म्हणाले, चीन आणि पाकिस्तान यांची ताकद काश्मीर खोऱ्यात महत्वपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या चांगल्या द्वीपक्षीय संबंधांमुळे दोन्ही देशांचा फायदा झाला आहे. परस्पर विश्वास, सन्मान, समजूतदारपणा तसेच सहकार्यावर आधारित संबंध यामुळे हे शक्य झाले आहे, ही मैत्री खरंतरं आता प्रत्येक दिवसागणिक वाढतच असल्याचे ते म्हणाले. अणू पुरवठा गट, काश्मिर मुद्दा, शांघाई सहकार्य संघटन यांमध्ये पाकिस्तानच्या पूर्ण सदस्यत्वासाठी त्याचबरोबर सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपल्याला चीनने सक्रीय पाठींबा दिल्याने त्यांनी चीनचे आभारही मानले.