ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पन्नास महिलांच्या कोणी कापल्या वेण्या

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) - दिल्ली, राजस्थान, हरियाना येथील महिलांना बेशुद्ध करून त्यांच वेणी कापण्याचा विचित्र प्रकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अशा पन्नास तक्रारी आत्तापर्यंत पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. पोलिसांना याबाबत अजून कोणालाही अटक केलेली नाही. कारण आरोपींना कुणीही पाहिलेले नाही.

सर्वप्रथम राजस्थानमधील काही गावामध्ये अशा घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दिल्ली, हरियानामध्ये अशा घटना घडत आहेत. घटनास्थळी काहीही पुरावा मिळाल्यामुळे पोलिस आणि संबधित गावकऱ्यांमध्ये चितेंचे वातावरण आहे.

ज्या ठिकाणी या घटना घडल्या त्या ठिकाणी अन्य इतर जणांनी आरोपीं किंवा कोणालाही पाहिलेले नाही. साधारण पन्नास वर्षाच्या पुढे असलेल्या महिलांच्या वेण्या कापल्या जात आहे. सुरवातीला या महिलाचे डोके दुखण्यास सुरवात होते. त्यानंतर त्या बेशुद्ध होतात. जाग आल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की त्यांची वेणी कोणीतरी कापली आहे.

यामागे कोणी मांत्रिक असल्याचे शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अंधश्रद्धेमुळे काहींनी आपल्या घरावर लिंबू- मिरची बांधली आहे. तर काहींनी आपल्या दारावर, भींतीवर हाताचे काळे पंजे उमटविले आहेत.