ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दहशतवाद्यांचा लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, २ जवान शहीद

श्रीनगर, दि. ३ (वृत्तसंस्था) - शोपियाना येथील लष्करी ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मेजरसह दोन जवान शहीद झाले आहेत, तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमध्ये उघडलेल्या धडक मोहिमेमुळे बिथरलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. शहीद मेजर आणि जवान दोघेही ६२ रायफल्सचे होते.

आज सकाळी शोपियान जिल्ह्यात हा हल्ला झाला. हल्लेखोरांमध्ये तीन दहशतवादी होते. लष्कराच्या ताफ्यावर बेछूट गोळीबार करून हे तिघेही फरार झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून शोधमोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे आज पहाटे कुलगाम येथील गोपालपोरा भागात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागात संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती बुधवारी रात्री सुरक्षा दलांना मिळाली. त्या माहितीनंतर लगेचच लष्कराच्या जवानांसह जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुगान गावाला वेढा दिला आणि काही वेळातच दहशतवाद्यांना संपवले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकजण मे रोजी टाकण्यात आलेल्या बँक दरोड्यात सामील होता.