ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानच्या पाठय़पुस्तकात हिंदूंबाबत ओकली जाते गरळ

इस्लामाबाद, दि. ५ (वृत्तसंस्था) - फाळणीविषयी खोटी कथा पाकिस्तानच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविली जात असून ७० वर्षांअगोदर भारत-पाक फाळणी आणि यादरम्यान झालेल्या रक्तपातासाठी हिंदू जबाबदार असल्याची मुक्ताफळे सरकारकडून मंजूर इतिहासाच्या पुस्तकात उधळण्यात आली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला होता. यानंतर मोहम्मद अली जिना तेथील पंतप्रधान झाले. बलुचिस्तानच्या शाळांमध्ये ५वीच्या इतिहासाच्या पुस्तकात हिंदूंनाठगठरविण्यात आले, मालमत्ता प्राप्त करण्यासाठी ज्यांनी मुस्लिमांचा नरसंहार केला आणि भारत सोडण्यास त्यांना भाग पाडले असा अत्यंत खोटा दावा तेथील इतिहासाच्या अभ्यासक्रमात करण्यात आल्याचे समोर आले.

त्याचबरोबर सीमेच्या या पलिकडे भारतात फाळणीवरून विद्यार्थ्यांना मात्र वस्तुस्थितीचा धडा दिला जातो. महात्मा गांधी यांनी देशाची फाळणी करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यांनी यासाठी उपोषण देखील केले. तर जिना यांनी गांधींच्या मताला विरोध दर्शवत स्वतंत्र पाकिस्तानसाठीचा आपला हट्ट सोडणे टाळल्याचे सत्य भारतीय विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे.

फाळणीची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानला मिळणा-या भूभागातील हिंदूंनी भारताची वाट धरली. तर भारतातील मुस्लिमांच्या अल्पसंख्येने पाकिस्तानात जाणे पसंत केले होते. बहुतेक हिंदूंना पाकिस्तानातून जीव मुठीत धरून पलायन करावे लागले होते. फाळणीनंतर अनेक हिंसक घटना घडल्या, ज्या नंतर हिंदू-मुस्लीम संघर्षात रुपांतरित झाल्या. या संघर्षात जवळपास २० लाख जण मारले गेले.