ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लवकरच सर्वोच्च न्यायालयात राममंदिराबाबतची नियमित सुनावणी

नवी दिल्ली : ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज अयोध्या राम जन्मभूमी वादाची सुनावणी होणार असून यासाठी तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ असणार आहे. संकेतस्थळावर याबाबत एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याआधी २१ जुलैला याबाबत संकेत दिले होते. अयोध्यामधील वादग्रस्त ठिकाणची जागा वाटत करण्यासंबंधित अलाहाबाद उच्च न्यायालय आदेश दिले होते. याला आव्हान देण्याची याचिका करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंह केहर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्राचूड यांनी हा निर्णय आम्ही घेऊ असे म्हटले आहे.

या प्रकरणी लवकरच सुनावणीची विनंती भारतीय जनता पार्टी (भाजप) राजस्थानचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. ही सुनावणी गेल्या वर्षांपासून प्रलंबित आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०च्या आपल्या निर्णयामध्ये विवादीत स्थळ निर्मोही अखाडा, वक्फ बोर्ड आणि रामलला यांच्यात विभाजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.