ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ब्लू व्हेलवर बंदी घालणे अशक्य, इंटरनेट तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) - देशात सध्या ब्लू व्हेल चॅलेंज या गेमवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत असली, तरी अशी बंदी घालणे अशक्य असल्याचे मत इंटरनेट तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या गेमवर बंदी घालण्याची मागणी विधानसभा आणि संसदेतही केली गेली. तसेच तो गेम संकेतस्थळावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. पण हा गेम मोबाइल किंवा संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतो, त्यामुळे त्यावर बंदी घालणे अशक्य असल्याचेसेंटर ऑफ इंटरनेट अँड सोसायटीया संस्थेचे उद्भव तिवारी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.

कुठले एक विशिष्ठ संकेतस्थळ या गेमसाठी नसल्यामुळे सगळ्या इंटरनेटवरच बंदी घातली तर हा गेम रोखता येईल, पण ते अशक्य आहे. प्लेस्टोअरवर किंवा संकेतस्थळांवर या गेमचा शोध घेतला तर तो सापडत नाही, त्यासाठी त्याचे निर्माते संभाव्य वापरकर्त्यांशी संपर्क साधतात. सध्या ब्लू व्हेल गेमला पर्याय म्हणून आणखी एक गेम तयार करण्यात आला आहे. यामध्ये ब्लू व्हेल मासा सगळे अडथळे पार करत पुढे जातो. या नव्या गेमध्ये मुलांना विविध टास्क करायला सांगतात.

पण सगळ्यासांठी घातक असलेला ब्लू व्हेल गेम ५० दिवसांच्या आव्हानांचा असून तो रशियात तयार झाला. या खेळामुळे रशियात १३० जणांचा बळी गेला आहे. ३० जुलैला मुंबईच्या मनप्रीत सहानी याने सात मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. तो ब्लू व्हेलचा भारतातील पहिला बळी होता. या गेमचे प्रशासक हे विविध ऑनलाइन पोर्टल वापरून मुलांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतात. त्यात इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्स ॅप तसंच इतर ऑनलाइन पोर्टलचा समावेश असल्याचे तिवारी यांनी सांगितले.