ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तानकडून ७ महिन्यात २८५ वेळी शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू, दि. ९ (वृत्तसंस्था) - पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला असून पाक सैन्याकडून जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांना लक्ष्य करण्यात आले.

पाक सैन्याने पूंछ जिल्ह्यातील मानकोट-बालनोई सेक्टरमध्ये भारतीय चौकीवर गोळीबार केला. त्यात एक जवान गंभीररित्या जखमी झाला होता. या जवानाचा नंतर मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कुमार असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.

दरम्यान, कालही बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येही नियंत्रण रेषेवर पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाक सैन्याच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला होता. यावर्षी ऑगस्टपर्यंत २८५ वेळा पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले आहे. २०१६मध्ये २२८वेळा शस्त्रीसंधीचे उल्लंघन करून भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते.