ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जदयूतून शरद यादव यांची होणार हकालपट्टी

पाटणा, दि. १० (वृत्तसंस्था) - मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जदयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांच्यात महायुती तोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर धुसफूस सुरुच असून आता शरद यादव यांची शिस्तभंगप्रकरणी जदयूतून हकालपट्टी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद यादव यांची राज्यसभेची खासदारकी पक्ष रद्द करण्याची शक्यता असून त्यांची सदस्यता पक्षादेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी रद्द होऊ शकते. नव्या नेत्याची निवड त्यांच्या जागी होईल, असे सांगितले जात आहे.

आजपासून जदयूचे माजी अध्यक्ष असलेले शरद यादव तीन दिवसांच्या बिहार दौऱ्याची सुरुवात करणार आहे. तसेच दिल्लीत १७ ऑगस्टला समान विचारांच्या नेत्यांची बैठकही त्यांनी बोलावली आहे. गुजराज राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस नेते अहमद पटेल यांना मत दिल्याचा दावा करणारे पक्षाचे एकमेव आमदार छोटू भाई वसावा यांचेही शरद यादव यांनी समर्थन केले होते.