ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चीनने खोडी काढली, अमेरिकी संसद सदस्यने सुनावले बोल

सिक्किम, दि. ११, (वृत्तसंस्था) - सिक्किम भूतानमधील डोकलाम भागात चिनी सैनिकांनी एक सडक बनविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून भारत चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ हा तणाव चालू असतानाच अमेरिकेतील एका प्रभावी संसद सदस्याने भारताच्या बाजूने मत व्यक्त करून चीनला खडे बोल सुनावले आहेत.

सिक्किमवरून भारत आणि चीनदरम्यान झालेल्या कोंडीवर या सदस्याने चिंता व्यक्त करतानाच डोकलाममध्ये चीनने खोडी काढल्याचा आरोप केला. इलियाना प्रांताचे काँग्रेसचे सदस्य राजा कृष्णमूर्ति यांनी हे मतप्रदर्शन केले आहे. ते म्हणाले, ‘‘डोकलाम पठारात जे काही चालू आहे, त्यामुळे मला खूप चिंता वाटते. चीनने यात काही प्रक्षोभक पावले उचलली, त्यामुळे या क्षेत्रात सध्या तणाव निर्माण झाला आहे.’’

कृष्णमूर्ति हे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले होते. या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती. मात्र त्या भेटीत या मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

‘‘सध्याच्या समस्येचा उपाय शांततेने मुत्सद्दीपणाने काढण्याचे आवाहन मी करतो. कोणत्याही देशाने प्रक्षोभक पावले उचलू नयेत, खासकरून सीमावादाच्या संदर्भात,” असेही ते म्हणाले.