ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देशातील सर्वात उंच ध्वज सीमेवर फडकला

अमृतसर, दि. १४ (वृत्तसंस्था) - भारताने पुन्हा एकदा अमृतसरमधील वाघा-अटारी सीमेवर सर्वात उंच ध्वज फडकवला आहे. महिन्यानंतर ३६० फूट उंच स्तंभावर पुन्हा तिरंगा फडकावण्यात आला. यापूर्वी हा ध्वज तीन महिन्यांपूर्वी फडकवण्यात आला होता, पण त्यावेळी हा ध्वज पुन्हा पुन्हा फाटत होता. त्यामुळे काही काळ तो फडकावण्यात आला नव्हता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवा ध्वज फडकावण्यात आला आहे.

मे रोजी या ध्वज स्तंभाचे उद्घाटन पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी केले होते. त्याची लांबी ११० मीटर (३६०फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. ११०मीटर लांब या ध्वज स्तंभाने रांचीमध्ये बनलेला ९१.४४ मीटर (३००फूट) उंच स्तंभाला मागे टाकले आहे. हा देशातील सर्वात उंच ध्वज स्तंभ मानला जातो.

हा ध्वज स्तंभ सीमेपासून केवळ १५० मीटर अंतरावर आहे. ध्वज स्तंभ सूर्योदय वेळी बीटिंग रिट्रीट पाहण्यासाठी आलेल्या हजारो पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्यानंतर इस्लामाबादने सीमेमध्ये ४०० फूट उंच पाकिस्तानी झेडा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने जर तसे केले तर तो जगातील आठवा सर्वात उंच ध्वज असेल.