ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अंबानींच्या रिलायन्सला सरकारने ठोठवला १७०० कोटींचा दंड

नवी दिल्ली, दि. १६ (वृत्तसंस्था) - मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि त्यांच्या भागीरादांना बंगालच्या खाडीमध्ये प्रकल्पात ठरल्यापेक्षा गॅसचे उत्पादन कमी करणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी सरकारने कडक कारवाई करत रिलायन्सला तब्बल २६. कोटी डॉलर (,७०० कोटी रूपये) एवढा दंड ठोठवला आहे. ही कारवाई कृष्णा-गोदावरी बेसिनच्या फिल्ड डी६ मध्ये २०१५/१६ या कालावधीत ठरवून दिलेल्या कोठ्यापेक्षा कमी उत्पादन केल्यामुळे करण्यात आली आहे.

दरम्यान यापूर्वीही रिलायन्सला असा दणका मिळाला असून कंपनीला यापूर्वी एप्रिल २०१० पासून सलग सहा वर्षे नियोजीत लक्ष्य गाठण्यात मागे पडल्यामुळे .०२ अरब डॉलर एवढा दंड या आधीही झाला होता. हा दंड प्रकल्पातून निघालेल्या गॅसतेलच्या विक्री ते प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पनातून रोख स्वरूपात भरायचा आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

आरआएल सोबत ब्रिटनची बीपी आणि कॅनडाची निको रिसोर्सेस या कंपन्यांचाही केजी डी६ प्रकल्पात समावेश आहे. अशा प्रकारे कारवाई करत दंड वसूल केल्यास त्याचा सरकारी तिजोरीला फायदाच होणार आहे. अधिकाऱ्याने केलेल्या दव्यानुसार, अशा प्रकारे दंड वसूली झाली तर, सरकारला अतिरिक्त १७. कोटी डॉलर एवढा फायदा होऊ शकेल.