ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतीय सैनिकांनी लडाखमधून चिनी सैनिकांना हुसकावून लावले

लेह, दि. १६ (वृत्तसंस्था) - मंगळवारी चीनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण ही घुसखोरी सतर्क भारतीय सेनादलांनी वेळीच हाणून पाडली. पण दोन्ही बाजूंकडून चिनी सैनिकांना अटकाव करताना झालेल्या दगडफेकीत काही सैनिक जखमी झाले. चिनी सैनिक काही वेळाने त्यांच्या हद्दीत परतले. या घटनेबद्दल लष्कराच्या नवी दिल्लीतील प्रवक्त्याने बोलण्याचे टाळले आहे.

गेला महिनाभर भारत चीनमध्ये सिक्कीमजवळील डोकलाम येथील वर्चस्वाच्या मुद्दय़ावरून वाद सुरू असतानाच लडाख सीमेवरही आता चीनने भारताच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवराचा ४५ किमी लांबीचा भाग भारतात तर ९० किमी लांबीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. चिनी सैन्याने स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी ते वाजण्याच्या दरम्यान या सरोवराच्या किनाऱ्यावरील फिंगर फोर आणि फिंगर फाइव्ह या ठिकाणी दोन वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न दोन्ही वेळा भारतीय सैन्याने हाणून पाडला.

भारतीय जवानांनी चीनचे सैनिक भारतीय हद्दीत घुसत असताना मानवी साखळी करून त्यांना अडवले. मात्र त्यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्याला भारतीय जवानांनीही तसेच उत्तर दिले. या दगडफेकीत दोन्ही बाजूंकडील काही सैनिक किरकोळ जखमी झाले.