ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जिल्हाधिकाऱ्याला महागात पडले सरसंघचालकांना ध्वजारोहणापासून रोखणे

तिरुअनंतपूरम, दि. १७ (वृत्तसंस्था) -  केरळमधील पल्लकडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना ध्वजारोहणापासून रोखल्या प्रकरणी त्यांची बदली करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी राजकीय व्यक्ती शाळेतील ध्वजारोहण करु शकत नाही, असे म्हटले होते.

पण मोहन भागवतांना १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी स्वत: शाळेनेच आमंत्रित केल्यामुळे मोहन भागवतांनी वादानंतरही ध्वजारोहण केले होते. दरम्यान, मोहन भागवत यांनी झेंडा फडकल्यानंतर मेरीकुथी यांनी सरकारला अहवाल सादर केला होता. त्या अहवालात मोहन भागवत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. त्यांनी पोलिसांना तसे आदेशही दिले होते. जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांची या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर बदली झाल्याने, तर्क-वितर्क लढवणे साहजिकच आहे. पण ही बदली नियमित असल्याचा केरळ सरकारचा दावा आहे. केवळ मेरीकुथी यांचीच नव्हे तर अन्य चार जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाल्याचे केरळ सरकारने म्हटले आहे. मेरीकुथी यांच्या जागी सुरेश बाबू यांची पल्लकडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.