ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कोपर्डी प्रकरणातील आरोपींची याचिका

नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंस्था) - सर्वोच्च न्यायालयाने राज्यासह देशभरात चर्चित असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली. आरोपींच्या वकिलांनी बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी केली होती. पण ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने तातडीने फेटाळल्यामुळे पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पीडितेच्या घरच्यांना निकम यांनी काय सल्ला दिला, तसेच या घटनेनंतर वृत्तवाहिनीवर अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती झाल्यामुळे या सगळ्यांची साक्ष घ्यावी, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला होता. न्यायालयात कोणत्याही साक्षीदाराचा खटल्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असणे गरजेचे आहे. भारतीय पुरावा कायद्यातील कलमानुसार कुठला साक्षीदार तपासावा, यासाठीचे नियम नमूद करण्यात आले आहेत. ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडितेच्या शरीरावर झालेल्या जखमांच्याबाबतीत अभिप्राय दिला, ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडितेला मृत घोषित केले आणि ज्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले, त्या सर्वांना साक्षीदार म्हणून तपासण्यात आले आहे. त्यामुळे अन्य साक्षीदारांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. फक्त खटला लांबवण्यासाठी कोणताही तार्किक आधार नसताना पाच जणांच्या उलटतपासणीची मागणी करण्यात आल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता.

बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून सरकारी वकील उज्जवल निकम, रवींद्र चव्हाण, राज्याचे हेल्थ इंटेलिजन्सचे संचालक डॉ. राजेंद्र थोरात, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नाशिक येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबचे डायरेक्टर, नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका आरोपीच्या वकिलांनी केली होती. विधानसभेत आणि एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत आरोपीला फाशी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर आरोपीच्या वकिलांनी मुख्यमंत्र्यांचे नाव साक्षीदारांच्या यादीत समाविष्ट केले होते.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दाखल केलेली याचिका गुरूवारी फेटाळून लावली. यापूर्वी सत्र न्यायालयानेही ही याचिका फेटाळून लावली होती. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आरोपीने औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.