ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अमेरिकेकडून एएच-६४ई अपाचे हेलिकॅाप्टर खरेदी करणार भारत

वॉश्गिंटन, दि. १८ (वृत्तसंस्था) - अमेरिकेकडून सहा मोठी बोंईग एएच-६४ई अपाचे हेलिकॅाप्टर खरेदी करण्याची मंजूरी गुरूवारी भारतीय सरंक्षण मंत्रालयाने दिली. अशा प्रकारचे २२ हेलिकॅाप्टर भारताने यापूर्वी खरेदी केले आहेत. सरंक्षण मंत्रालयाची सर्वाच्च निर्णायक संस्था असलेल्या डिफेन्स् एक्विजिशन कांऊसिलने या खरेदीला मंजूरी दिली आहे. या हेलिकॅाप्टर खरेदीसाठी सुमारे ४१६८ कोटी रूपये इतका खर्च येणार आहे.

सरंक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनुसार, भारतीय लष्कराने ११ अपाचे हेलिकॅाप्टरच्या खरेदीची मागणी केली होती. पण लष्कराच्या आर्थिक समितीने सहा हेलिकॅाप्टर खरेदीला मंजूरी दिली होती. ही हेलिकॅप्टार पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्याचा मानस भारतीय लष्कराचा आहे. यामुळे वायू सेनेची ताकद वाढेल. या एएच-64 अपाच्या हेलिकॅाप्टरबरोबर भारत यासंबधीचे उपकरण, सु्ट्टे भाग, तोफगोळे, प्रशिक्षण आदी अमेरिकेकडून घेणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगितले.