ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

इन्फोसिसच्या एमडी, सीईओ पदाचा विशाल सिक्कांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली, दि. १८ (वृत्तसंस्था) - विशाल सिक्का यांनी माहिती तंत्रज्ञान सेवा, कन्सल्टिंग आणि डिजीटल ट्रान्सफॉर्मिंग क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला असून इन्फोसिसने याचा आज खुलासा केला आहे.

या दोन्हीही पदाच्या जबाबदाऱ्या सध्या यु.बी. प्रविण राव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आल्या आहेत. कंपनीने पत्रक काढून माहिती दिली आहे, की इन्फोसिस ही सॉफ्टवेअर सेवा निर्यात करणारी देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. दरम्यान, सिक्का यांची कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. त्यांनी नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तीन वर्ष पूर्ण केले आहेत.

इन्फोसिस जागतिक अर्थव्यवस्थेच्या उलाढालीत अनेक आव्हाने पेलत आहे. मागील काही महिन्यात कंपनीच्या महत्त्वाच्या कार्यकारी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यात अनिर्बन डे, युसूफ बशीर आणि रितीका सुरी यांच्या समावेश आहे.