ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकिस्तान सरकारचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये निषेध

नवी दिल्ली, दि. १९ (वृत्तसंस्था) - पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेवर पाकिस्तान सरकारकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात तेथील जनता पेटून उठली असून पाकिस्तान सरकारबद्दल येथील सामान्य जनता आणि विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. दरम्यान आज पाकव्याप्त काश्मीरमधील हजारो लोक रस्त्यावर उतरत एक महारॅली काढली आहे. या रॅलीचे आयोजन या जम्मू-काश्मीर विद्यार्थी संघटनेकडून जंदालीमध्ये करण्यात आले होते. पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे, अशी मागणी यात सहभागी झालेल्या तरुणांनी केली. या तरुणांनी यादरम्यान पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

या संदर्भातील वृत्त एका वृत्त संस्थेने दिले असून हा मोर्चा पाकिस्तान सरकारकडून होणारे अत्याचार आणि गळचेपीविरोधात विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी काढला. विद्यार्थ्यांनी यावेळी स्वातंत्र्याची मागणीही केली. पाकिस्तान सरकार दरवेळेस आमच्यावर अन्यायच करत नाही तर आमची गळचेपी करण्याचे कामही करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.