ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मालेगाव बॉम्बस्फोट आरोपी कर्नल पुरोहित याचा जामीन मंजूर

नवी दिल्ली, दि. २१ (वृत्तसंस्था) - सर्वोच्च न्यायालयाने वर्षानंतर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याचा जामीन मंजूर केला आहे.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात एका मशीदीसमोर दोन बॉम्बस्फोट झाले होते. एकूण सात जण या स्फोटात ठार झाले होते. याच दिवशी गुजरातमधील मोडासा येथेही बॉम्बस्फोट झाले होते. यात जण ठार झाला होता. दहशतवाद विरोधी पथकाने मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी चौकशीतून प्रज्ञा सिंह ठाकूरला ताब्यात घेतले. त्यानंतर लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांनाही आरोपी म्हणून एटीएसने अटक केली. एटीएसने सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि बजरंग दलावर संशय व्यक्त केला होता. यानंतर अभाविपचे पदाधिकारी बन्सल यांनी स्पष्टीकरण दिले होते.

याच प्रकरणातील दुसरी आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या सध्या जामीनावर बाहेर असून साध्वी ठाकूरला मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये जामीन मंजूर केला होता. यावेळी न्यायालयाने पुरोहितला जामीन देण्यास नकार दिला होता. जामिनानंतर साध्वीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते.