ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… तोपर्यंत ट्रीपल तलाकवर आजपासून बंदी - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. २२ (वृत्तसंस्था) - आज सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ट्रीपल तलाकप्रकरणी अंतिम निकाल सुनावला असून ट्रीपल तलाकचा चेंडू न्यायालयाने केंद्र सरकारकडे टोलवत, संसदेला सहा महिन्यात याबाबतचा कायदा बनवण्याचा आदेश दिला आहे. जोपर्यंत कायदा तयार होत नाही तोपर्यंत ट्रीपल तलाकवर बंदी घालण्यात आली आहे. ट्रीपल तलाक प्रकरणावर सरन्यायाधीशांसह न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय दिला. पण ट्रीपल तलाकवरुन पैकी न्यायाधीश हे ट्रीपल तलाकविरोधात तर न्यायाधीश हे तलाकच्या बाजूने होते.

याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने आजपासून ट्रीपल तलाक बंद. पण त्यासाठी संसदेने सहा महिन्यात कायदा करावा लागणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत सहा महिन्यात कायदा झाला नाही, तर ट्रीपल तलाकवरील स्थगिती कायम राहणार आहे. आजपासून कोणीही तोंडी तलाक दिला तर तो अवैध असेल. त्याचबरोबर केंद्र सरकारला सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन कायदा बनवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन देखील न्यायालयाने केले आहे.

सरन्यायाधीश जे एस खेहर म्हणाले, संसदेने ट्रीपल तलाक प्रकरणी लक्ष घालावे. सहा महिन्यात संसदेने याबाबतचा कायदा करावा. ट्रीपल तलाकवर त्यासाठी आम्ही सहा महिने स्थगिती घालत आहोत. जर या सहा महिन्यात कोणीही तोंडी तलाक दिला तर तो अवैध ठरणार आहे.