ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

डोकलाम मुद्दयावरून चीनची भारताला पुन्हा धमकी

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) - गेल्या दोन महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये डोकलाम मुद्द्यावरून तणाव असून चीनने याच पार्श्वभूमीवर भारताला पुन्हा एकदा धमकी दिली. भारतात जर चिनी सैन्य घुसले, तर अराजक माजेल, अशी धमकी चीनने दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, चीनने सीमेवरील डोकलाममध्ये रस्त्याची उभारणी करण्यास सुरूवात केल्याने दिल्लीला धोका असल्याचा भारताचा दावा हास्यास्पद आहे.

आपली सीमा ओलांडण्याची परवानगी चीन कोणत्याही देशाला देत नाही. रस्त्याच्या उभारणीचे निमित्त भारताने पुढे करुन बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली आहे. भारताने डोकलाममध्ये प्रवेश करण्यासाठी दिलेले कारण हास्यास्पद असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी सांगितले. भारताचा दावा मान्य केल्यास, कोणताही देश शेजारी देशात घुसखोरी करु शकतो. भारताकडून सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. मग भारतीय हद्दीत चीनने घुसखोरी करायची का ? चीनने असे केल्यास भारतात अराजक माजेल, असा इशारा हुआ चुनयिंग यांनी दिला. भारतामध्ये अशांतता पसरवण्यासाठी चीन नवी खेळी करत असून त्यांनी या कामासाठी सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांना सहकार्य करण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चीन अरूणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील नागा उग्रवाद्यांच्या संपर्कात आहे. उग्रवाद्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी चीनच्या हालचाली सुरू आहेत. विशेषत: आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलले जात आहे.