ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उद्या राम रहीम बलात्कार प्रकरणाचा निकाल

चंदीगड, दि. २४ (वृत्तसंस्था) - विशेष सीबीआय न्यायालय उदया डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील १५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणी निकाल देणार असून राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम १४४ लावले आहे. २५ ऑगस्टला राज्यातील शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय २४ आणि २५ ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.

सुनावणीआधी प्रशासनाला राम रहीमचे समर्थक खुले आव्हान आणि धमकी देत असून पंजाब आणि हरियाणा राज्यातील कायदा-सुव्यवस्था न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बिघडण्याची शक्यता असल्याने ५० पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे.

सध्या दोन हजारांहून जास्त जवान पंचकुला जिल्ह्यात सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. जिल्ह्याला छावणीचे स्वरुप आले आहे. रस्त्यांवर बॅरिकेटिंग केली आहे. हरियाणाच्या २१ जिल्ह्यातील सुरक्षेत वाढ केली आहे. तर संपूर्ण राज्यात कलम १४४ लावण्यात आले आहे. पंजाब आणि हरियाणा सरकारला बाबासंदर्भात येणारा निकाल पाहता हायअलर्ट देण्यात आला आहे. २५ ऑगस्टला निर्णय येणार असल्याने चंडीगडच्या सेक्टर १६ मधील क्रिकेट स्टेडियम तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची शक्यता आहे.