ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसले

चंदीगड, दि. २६ (वृत्तसंस्था) - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमचं सिरसामधील आश्रम रिकामं करण्यासाठी आज मोठी कारवाई करण्यात आली. भारतीय सैन्य डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसलं आहे. आश्रमाबाहेर सैन्य, निमलष्करी दल, पोलिस आणि शीघ्र कृती दलाचे जवान इथे दाखल झाले आहेत. हे आश्रम डेरा सच्चा सौदाचं मुख्यालय आहे. आश्रमात बसलेल्या समर्थकांना बाहेर काढून ते सील करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. आश्रमात हजारो समर्थक असून त्यात महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना बाहेर काढण्याचं आव्हान सैन्यासमोर आहे.

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी १५ वर्षांनी दोषी ठरल्यानंतर बाबा राम रहीमच्या समर्थकांनी अक्षरश: हैदोस घातला. हरियाणा आणि पंजाबमध्ये आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला असून २५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २९ पंचकुला आणि सिरसामधील आहे.

राम रहीमच्या अनुयायींनी घातलेल्या हैदोसामुळे नाराज झालेल्या पंजाब-हरियाणा हायकोर्टाने डेराची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय सुनावला. त्यानंतर आता बाबा राम रहीमची देशभरातील आश्रमं सील केली जात आहेत. हरियाणातील राम रहीमची आतापर्यंत ३६ आश्रमं सील करण्यात आली आहेत. यामध्ये करनाल, अंबाला, कॅथल आणि कुरुक्षेत्रच्या आश्रमांचा समावेश आहे. करनालमध्ये पोलिसांनी राम रहीमच्या १५ समर्थकांना अटक केली आहे. यांच्याकडून एका अॅम्ब्युलन्समधून पेट्रोल आणि लाठ्याकाठ्या जप्त केल्या आहेत.

डेरामध्ये राम रहीमच्या महिला समर्थकही आहेत. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा पथकांमध्ये महिलांचाही समावेश आहे. सैन्याच्या कारवाईत कोणीही अडथळा आणल्यास त्यांना त्याक्षणी गोळी मारली जाईल, असं सैन्याकडून सांगितलं जात आहे.